Monday, January 24, 2011

तू आणि मी

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

आपल्या स्वप्नातल्या घरकुल बघतोय
तू आणि मी...

गवताच्या पात्यांवरल्या मनमोहक दवबिंदूंना न्याहाळ्तोय
तू आणि मी...

पावसाच्या रिमझिम सरींना बिलगण्याचा प्रयत्न करतोय
तू आणि मी...

हिवाळ्यातलं शिरशिरणारं ऊन झेलण्याचा आनंद उपभोगतोय
तू आणि मी...

एकमेकांना आधार देण्याचा अट्टाहास करतोय
तू आणि मी...

ही सारी स्वप्नं डोळ्यात साठवून नवी सुरूवात करतोय
तू आणि मी...

या जीवनप्रवासाच्या वाटेवरुन चालताना
तू आणि मी...

4 comments:

  1. श्वेता..छान कविता :)
    माझ्या ब्लॉगचा पत्ता: http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  2. chaan kavita aahe....!!!

    ReplyDelete
  3. अप्रतिम! सहज सुंदर... जणू मनातले हळवे रंग जसेच्या तसे कागदावर अलगद उमटलेत. इतकी निखळ कविता इतक्यात वाचयलाच मिळाली नव्हती.
    माझ्या कवितांचा ब्लॉग:
    http://mi-asach-lihito.blogspot.com/search/label/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE

    ReplyDelete