धागा हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी
बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती
औक्षिते प्रेमाने,उजळूनी दिपज्योती
प्रेमळ निखळ या नात्यात,अशीच फुलावी प्रीती
बंधन नव्हे हे तर बंध प्रेमाचे
ह्या तर तुझ्या-माझ्यातल्या हळव्या रेशीमगाठी
भावाची छाया
बहिणीची माया
अशी ही आपुल्या
नात्याची काया
रक्षाबंधनाची
रीत ही प्यारी
ह्या नात्यासम आपुल्या
तुला माझी भेट ही न्यारी
I liked this poetry...fine, very fine!
ReplyDelete