तो म्हणजे चंद्र,तो म्हणजे तारा
तो म्हणजे मला छेडणारा उनाड वारा..
तो म्हणजे ढग,तो म्हणजे गारा
तो म्हणजे मज बिलगू पाहणार्या पावसाच्या धारा..
कधी तो अबोल,कधी बोल मंद हळवासा
कधी तो शांत किनारा,कधी सागर वेडापिसा..
कधी तो धडकन,कधी तो श्वास
कधी तो माझ्या मनीचा ध्यास..
कधी शोधते मी त्याला
माझ्या मनाच्या गावात..
कधी तोच भेटतो अलगद
स्वप्नी चांदण्यात..
No comments:
Post a Comment